मध्य प्रदेशात भाजप मंत्रिपुत्राचा तमाशा; पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न
एक हॉटेलमालक आणि त्याच्या पत्नीवर हल्ला करणाऱया अभिज्ञान पटेल या मंत्रिपुत्राविरुद्ध शहापुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, पोलिसांनी आपल्याला व मित्रांना धक्काबुक्की केली, असा आरोप करणाऱया अभिज्ञानच्या तक्रारीवरून चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांचा अभिज्ञान मुलगा आहे. एका पत्रकाराला तो मारहाण करत असताना मध्ये पडलेल्या हॉटेल मालक व पत्नीलाही त्याने मारहाण केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल होत असताना त्याने पोलीस ठाण्यात येऊनही धिंगाणा केला होता. त्याचे वडील नरेंद्र पटेल यांनीही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आणि ते अभिज्ञानला घेऊन निघून गेले, असे समजते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू तिवारी यांनी अभिज्ञानवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मारहाण झालेल्या पत्रकाराची स्वतंत्र तक्रार का नोंदवून घेतली नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List