केसगळतीवर चहाचा कसा वापर करायला हवा, जाणून घ्या
केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला सर्वांनाच भेडसावत आहे. केसगळतीमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळती होऊ लागल्यास आपण अनेक उत्पादनांचा वापर करतो. ही उत्पादने घरगुती असली तर आपल्या खिशालाही फटका बसत नाही. केसवाढीसाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु रासायनिक उत्पादनांमुळे केसांवरही विपरीत परीणाम होऊ लागतो. अशावेळी पूर्वापार चालत आलेले अनेक उपाय कामी येतात.
काळा चहा हा त्यातलाच एक महत्त्वाचा उपाय. काळा चहा हा पिण्यासाठी सुद्धा चांगला असतो. हा चहा आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. तसेच हा चहा केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. काळ्या चहामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच चहा आपल्या डोक्यावरील त्वचेवर लावल्याने केसांमध्ये कोंडा आणि खाज येण्याची समस्या उद्भवत नाही. केसांची वाढ उत्तम करायची असेल तर, बाजारातील उत्पादनांपेक्षा काळा चहा हा एक उत्तम पर्याय आहे.
काळ्या चहाचा स्प्रे
तुम्हाला कमी वेळात केसांची वाढ हवी असल्यास, या चहाचा स्प्रे देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला चहा उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तो थंड झाल्यावर बाटलीत भरावा. केसावर हे पाणी स्प्रे करुन, नंतर 30 मिनिटे तसेच राहू द्यावे.
यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा स्प्रे लावल्याने तुमच्या केसांची वाढ सुधारेल.
काळा चहा कसा बनवायचा?
यासाठी तुम्हाला 3 ते 4 काळ्या चहाच्या बॅग्ज घ्याव्या लागतील. या टी बॅग्ज पाण्यात उकळवा. मग हे पाणी थंड होऊ द्यावे लागेल. हे पाणी तुमच्या केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा चहा केसांना लावल्याने तुमचे केस ओलावा टिकून राहतील. तसेच केस गळतीची समस्याही कमी होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List