दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या

दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या

दिवसभर चपात्या मऊ आणि ताज्या ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. पीठ व्यवस्थित मळण्यापासून ते चपात्या झाकून ठेवण्यापर्यंत आपण काही महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करणे गरजेचे आहे.

चपात्या आपल्या आहारातील प्रमुख घटक आहेत. परंतु अनेकदा चपात्या या वातड होता किंवा कडक होतात. कोरड्या चपात्या खातानाही मजा येत नाही.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, जाणून घ्या

चपातीचे पीठ मळताना कोमट पाण्याने मळून घ्या. पीठ मळण्यासाठी कोमट पाणी किंवा दूध वापरा. ​​पीठ मळल्यानंतर ते ओल्या कापडाने झाकून ठेवा आणि किमान 15-20 मिनिटे राहू द्या. पीठ मळून ठेवल्यामुळे ग्लूटेन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे चपाती मऊ होतात. शिवाय चपाती लाटायला देखील सोपी होते.

चपातीचे पीठ मळाताना पीठात तेल किंवा तूप घालावे. यामुळे पीठ मऊ होते आणि सहज लाटताही येते.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, जाणून घ्या

पीठात तेल किंवा तूप घालल्याने चपात्या मऊ होतात. एका पीठाच्या गोळ्यासाठी एक किंवा दोन चमचे तेल पुरेसे आहे.

चपाती आतून फुगलेल्या आणि मऊ राहण्यासाठी मध्यम आचेवर भाजाव्यात. जास्त करपवु नयेत.

चपाती भाजून झाल्यानंतर लगेच त्यावर तूप किंवा बटर लावा. यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्या मऊ आणि चवदार बनतात.

आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू अस्मिता जागी केली असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. तसेच बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून...
दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या
सौदी अरेबियामध्ये बसचा भीषण अपघात, 42 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू
ब्लँकेट आणि स्वेटर वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी या टिप्सचा वापर करावा, वाचा
लॅपटॉपची स्क्रीन पुसायची असेल तर… हे करून पहा
रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज
असं झालं तर… आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बंद झाला…