भरधाव कार वरातीत घुसली, तिघांचा मृत्यू; 16 जण गंभीर जखमी

भरधाव कार वरातीत घुसली, तिघांचा मृत्यू; 16 जण गंभीर जखमी

भरधाव कार लग्नाच्या वरातीत घुसल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघातात तीन वऱ्ह्यांड्याचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गावात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

बेतिया-बगाल राष्ट्रीय महामार्गावरील बिशुनुरवा गावाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अनियंत्रित कार लग्नाच्या वरातीत घुसली आणि अनेकांना चिरडत गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिंदे गटात नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी; संध्या कोसुंबकर यांच्या अपक्ष अर्जाने महायुतीची डोकेदुखी वाढली शिंदे गटात नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी; संध्या कोसुंबकर यांच्या अपक्ष अर्जाने महायुतीची डोकेदुखी वाढली
रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे गटाला बंडखोरीचा फटका बसला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज...
Ratnagiri News – चिपळूण नगर परिषद निवडणूक, शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी 15 उमेदवारांचे अर्ज दाखल
रशियाविरुद्धच्या युद्धासाठी युक्रेन हवाई शक्ती वाढवणार; फ्रान्ससोबत केला 100 राफेल विमानांचा करार
Pune News – नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच, कंटनेरची तीन ते चार वाहनांना धडक
Delhi Car Blast – रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर
मुलींना समान संधी मिळण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देईन! वर्ल्ड कप विजेत्या महाराष्ट्राच्या लेकीचा निर्धार
शेअर बाजार नवा विक्रम नोंदवणार? निफ्टीने 26 हजाराचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला; गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई