Photo – शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शक्तिस्थळावर लोटला निष्ठेचा जनसागर!
शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी शिवतिर्थावरील स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

यावेळी जालनाहून अशोक कदम व अन्य शिवसैनिक मशाल घेऊन बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळी आले होते. याशिवाय महिला आबालवृद्धांनीही हजेरी लावली आहे.

यावेळी अमर रहे… अमर रहे… बाळासाहेब अमर रहे…. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…एकच ब्रॅण्ड… ठाकरे ब्रॅण्ड अशी घोषणा देण्यात आल्या.

तसेच मैदानात भव्य रांगोळी साकारत बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List