हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं
हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते ती योग्य आहाराची. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं एक खाद्य मानलं जातं ते म्हणजे गूळ अन् चणे. घरातील मोठ्यांकडून अनेकदा हे ऐकलं असेल की गूळ अन् चणे खाणे किती शक्तीवर्धक असते. ते चवीला तर चांगले असतेच पण त्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते.
तुम्ही देखील नैसर्गिक पद्धतीने आरोग्य निरोगी ठेवण्याचा विचार करत असाल तर डाएटमध्ये गूळ आणि चण्याचा समावेश करणं फायदेशीर ठरते. गूळ – चणे एकत्रित खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतात. गूळ आणि चणे खाण्याचे फायदे अनेक फायदे आहेत. ते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
शरीराला ताकद मिळते
तज्ज्ञांच्या मते गूळ आणि चणे खाल्ल्यास शरीराला लगेचच ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे शरीरातील ऊर्जा जास्त काळ टिकून राहते. हिवाळ्यामध्ये थकवा आणि आळस अधिक जाणवतो. म्हणून डाएटमध्ये गूळ-चण्याचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
पचनप्रक्रिया सुधारते
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, गुळामुळे पाचक एंजाइम्स सक्रीय होतात, चण्यामध्ये फायबर अधिक असतात; ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळते.
हाडे मजबूत होतात
थंडीच्या दिवसांत सांधेदुखीची समस्या अनेकांना जाणवते. यावर उपाय म्हणून गूळ-चणे खाणे फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या माहितीनुसार चण्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम तर गुळामध्ये कॅल्शिअम हे गुणधर्म असतात. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. सांधेदुखी किंवा संधिवात यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते
गुळातील आर्यनचे गुणधर्म नव्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात आणि रक्त देखील शुद्ध होते. चण्यामध्ये प्रोटीन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीर आतील बाजूनं मजबूत होतं. सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
त्वचेवर तेज येते
गूळ आणि चणे एकत्रित खाल्ल्यास अॅनिमिया म्हणजे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल, हा डाएट विशेषतः महिलांसाठी लाभदायक ठरतो. त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्येतून सुटका मिळेल.
दिवसभरात किती प्रमाणात गूळ-चण्यांचे सेवन करावे?
नियमित 25-30 ग्रॅम भाजलेले चणे आणि 15-20 ग्रॅम गूळ खाणे योग्य आहे.अतिप्रमाणातही गुळ आणि चणे खाऊ नये अन्यथा पोटाचे त्रास होऊ शकतात. तसेच गॅस, पोट फुगणे किंवा वजन वाढणे यांसारख्या समस्या देखील होऊ शकतात. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये गूळ-चण्याचा समावेश करू शकता. पण मर्यादित स्वरुपातच गूळ-चणे खाणे. योग्य आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List