ठाण्यात महावितरणची 42 लाखांची वीजचोरी, रिमोट सर्किटच्या मदतीने फसवणूक

ठाण्यात महावितरणची 42 लाखांची वीजचोरी, रिमोट सर्किटच्या मदतीने फसवणूक

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून 42 लाखांची वीजचोरी करणाऱ्या दोघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराम शेट्टी व शैलेश डेढिया अशी त्यांची नावे आहेत. या वीज चोरांनी मागील दोन वर्षांत रिमोट सर्किटच्या मदतीने 1 लाखाहून अधिक युनिटचा वापर करत महावितरणची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

कोलशेत परिसरातील ‘द रेकडी’ हॉटेलच्या मीटर रीडिंग डेटामध्ये अनियमितता दिसून आली. याबाबत भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी कोलशेत उपविभागाला मीटर तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागातील सहाय्यक अभियंता विठ्ठल माने, फॉरमन किरण दंडवते व प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बने यांनी हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड केल्याचे दिसले. सखोल तपास केला असता ग्राहकाने रिमोट सर्किट लावून वीजचोरी केल्याचे निष्पन्न होताच पथकाने ग्राहक शिवराम शेट्टी व विद्युत वापरकर्ता शैलेश डेढियाविरोधात गुन्हा दाखल केला.

वीजचोरी हा फौजदारी गुन्हा असून ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा. अनधिकृत वीज वापरल्यास याचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. महावितरणची वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे व यापुढे अशी वीजचोरी आढळ्यास वीज चोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू अस्मिता जागी केली असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. तसेच बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून...
दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या
सौदी अरेबियामध्ये बसचा भीषण अपघात, 42 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू
ब्लँकेट आणि स्वेटर वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी या टिप्सचा वापर करावा, वाचा
लॅपटॉपची स्क्रीन पुसायची असेल तर… हे करून पहा
रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज
असं झालं तर… आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बंद झाला…