वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील, प्रकाश केणे, तालुकाप्रमुख नीलेश पाटील आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी निकिता गंधे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नगरसेवकाची निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ भाग्यश्री धानवा, प्रभाग क्रमांक २ प्रीती गंधे, प्रभाग क्रमांक ४ मधून मिथुन चौधरी, शैलेश चौधरी, प्रभाग क्रमांक ५ मधून संतोष रसाळकर, प्रभाग क्रमांक ६ मधून प्रिया गंधे, प्रभाग क्रमांक ८ मधून चेतन कोळेकर, प्रभाग क्रमांक १० मधून गोपाळ आगिवले, यांचा समावेश आहे.
रखडलेली विकासकामे मार्गी लावणार
वाडा शहरात विकासकामांची वाट लागली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. तलावाच्या सुशोभीकरणाला सुरुवात झालेली नाही. नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच शहरवासीयांचे अन्य प्रलंबित प्रश्नही सोडवण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया निकिता गंधे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List