साई सुदर्शनने दिले मोहित-राशीदलाही विजयाचे श्रेय
गुजरात टायटन्सला विजय मिळवून देणाऱया साई सुदर्शनने संघाच्या यशाचे श्रेय मोहित शर्मा आणि राशीद खान यांनाही दिले. माझ्या फलंदाजीमुळे संघ जिंकल्याचा मला निश्चितच आनंद आहे. वेगवान गोलंदाजीसमोर या खेळपट्टीवर खेळणे जरा कठीणच होते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणेही अवघड होते. अशा खेळपट्टीवर मोहित शर्मा आणि राशीद खानने अप्रतिम गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 162 धावांवर रोखण्यात यश मिळवले. साईला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेण्यात आले आणि त्याने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवताना 36 चेंडूंत 45 धावा ठोकत संघाचा विजयाचा मार्ग सोपा केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List