राजगडावर महिलेच्या डोक्यावर कोसळला दगड

राजगडावर महिलेच्या डोक्यावर कोसळला दगड

राजगडावरील बालेकिल्ल्याच्या शेजारी एक 31 वर्षीय पर्यटक महिला डोक्यावर दगड कोसळल्याने गंभीर जखमी झाली आहे. रविवारी (दि. 16) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. वर्षा दत्तात्रय हुंडारे (रा. मुंबई) असे जखमी महिलेचे नाव आहे. माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे बापू साबळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेवर प्राथमिक उपचार केले. तसेच बापू साबळे, विशाल पिलावरे तसेच चार-पाच जणांनी खडतर मार्गावरून 25 मिनिटांत जखमीला बालेकिल्ल्यावरून खंडोबाच्या मळ्यापर्यंत सुरक्षित आणले. जखमी महिलेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसपाटील शिर्के, हवेली आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य ओंकार ओक यांनीही यासाठी सहकार्य केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली; 30 जणांची सुखरूप सुटका, जुन्या बांधकामांमुळे हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली; 30 जणांची सुखरूप सुटका, जुन्या बांधकामांमुळे हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दिव्यातील दुमजली सावळाराम स्मृती चाळीच्या पहिल्या मजल्याची गॅलरी शनिवारी रात्री उशिरा कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या चाळीतील...
प्लास्टिकच्या आवरणात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अखेर दर्शन, मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले अनावरण
उरण ते मुंबई करा ‘बेस्ट’ प्रवास; द्रोणागिरी नोडमधून वांद्रे स्टेशन, वाशी, कुलाबा थेट बससेवा, विद्यार्थी, व्यापारी, कामगारांना दिलासा
मनमानीपणे गाडी पार्क केल्यास मोबाईलवर थेट चलन, ठाणे वाहतूक शाखेचा बेशिस्तीला ‘ब्रेक’
ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती, उरणमधील शिलालेखांना फासला शेंदूर
कसाऱ्याच्या मोखवणेत आगडोंब, ढाबा जळून खाक; प्राणहानी नाही
वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या निकिता गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल