ट्रेंड – तरुणी बनवत होती रील, अचानक आले माकड आणि केला विचका
On
आजकाल कुठल्याही पर्यटनस्थळावर तरुण पिढी रील बनविताना दिसते. रील बनविताना अनेक मजेदार प्रसंग घडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुलगी झाडाच्या फांदीवर झोपून रील बनवित असते. एका गाण्यावर छान पोझ देते. त्याच वेळी अचानक वरून एक माकड तिच्या अंगावर उडी मारते. तरुणी घाबरून लगेच खाली उतरते आणि माकड वर निघून जाते. हे सगळे अगदी काही सेपंदांत घडते. पाहणारे काही क्षण स्तब्ध होतात, पण नंतर सगळेच हसायला लागतात.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
17 Nov 2025 06:07:05
सरकारी मालकीच्या जमिनीचा सातबारा असणाऱ्या उताऱ्यावरील इतर हक्क, कुळ वहिवाट, वतन तसेच आकारी पड जमिनींचे जुने उतारे शोधून कुलमुखत्यारपत्र घेऊन...
Comment List