तरीही मोदी म्हणतात… भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच
भ्रष्टाचाऱयांना आपल्या गोटात घेऊन पवित्र करण्याच्या मोदी सरकारच्या ‘गॅरंटी’वर देशभरातून जोरदार टीका होत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठ येथील जाहीर सभेत बोलताना मात्र भ्रष्टाचाऱयांविरुद्ध गळा काढला. भ्रष्ट लोकांनी कान उघडे ठेवून ऐकावे. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच, असे विधान मोदींनी केले.
येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्या भ्रष्टाचारविरोधी जुन्या लढाईचा नव्याने नारा दिला. मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱयांपासून वाचवण्यासाठी मोठी लढाई लढतोय, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार!
जाहीर सभेचे निमित्त साधून मोदींनी देशातील महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे स्वप्न दाखवले. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे काम केले जात आहे. याचा 2029 मध्ये हिशोब घ्या, अशी नवीन गॅरंटी मोदींनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List