भ्रष्टाचाऱ्यांना भाजपची दारे सदैव उघडी, निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे मोदींची गोची

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपची दारे सदैव उघडी, निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे मोदींची गोची

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेतेच मोदी सरकारची गोची करताना दिसत आहेत. त्यांच्या विधानांमुळे भाजप सरकारचा खरा चेहरा उघडा पडत असल्याचे चित्र आहे. आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच भ्रष्टाचाऱयांसाठीही भाजपची दारे सदैव उघडी असतात, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या शिखर परिषदेत त्या बोलत होत्या.

ज्यांना भाजपने भ्रष्टाचारी म्हणून हिणवले गेले त्यांनाच आता भाजपमध्ये घेतले गेले. याबद्दल विचारले असता आम्ही त्यांना पक्षात घेत नाही, तेच आमच्यासोबत येत आहेत. सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले. निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. विरोधी पक्षांच्या मागे पेंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला. एकेकाळी ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवत होतात तेच आता भाजपसोबत आहेत. आदर्श घोटाळय़ाचे आरोपी अशोक चव्हाण भाजपसोबत आहेत, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा आरोप झालेले अजित पवार आता भाजपच्या विकासाचे आयकॉन झालेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा परखड सवाल पत्रकाराने विचारला असता, आम्ही भाजपमध्ये त्यांचे स्वागत करतो, असे त्या म्हणाल्या. निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भाजपमध्ये प्रवेश होताच चौकशी बंद

अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आदर्श घोटाळय़ात त्यांचे नाव आल्याने त्यांना पद सोडावे लागले. चव्हाणांची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श घोटाळय़ावरून चव्हाणांना लक्ष्य केले होते. चव्हाण भाजपवासी होताच ही चौकशी बंद झाली.

तब्बल 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळय़ाचा आरोप असलेले अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी घेताच त्यांची फाईल बंद करण्यात आली. शिखर बँक घोटाळय़ातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. मात्र ती चौकशीही थांबली आहे. मुख्य म्हणजे मोदींनी सिंचन घोटाळय़ावरून आरोप केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;