पाँडिचेरीत रामायणावर आधारित नाटकात विकृत सादरीकरण केल्याने खळबळ

पाँडिचेरीत रामायणावर आधारित नाटकात विकृत सादरीकरण केल्याने खळबळ

पाँडिचेरी विद्यापीठाच्या वार्षिक महोत्सवात रामायणावर आधारित नाटकाचं विकृतरित्या सादरीकरण केल्याने एकच खळबळ माजली आहे. या नाटकात रामायणाच्या पात्रांना विकृत पद्धतीने दर्शवल्याचा आरोप होत आहे.

पाँडिचेरी विद्यापीठात एझिनी नावाच्या सांस्कृतिक उत्सवात हे नाटक सादर झालं होतं. त्याचं नाव सोमायनम असं होतं. सीतेला रावण गोमांस भेट म्हणून देत असल्याचं यात दाखवण्यात आलं तसंच, हनुमानाच्या व्यक्तिरेखेचं चित्रणही अवमानास्पद करण्यात आलं. सीता अपहरणाचा प्रसंग, तसंच अग्निपरीक्षेचा प्रसंग यांचंही विकृत पद्धतीने चित्रण करण्यात आलं, असा आरोप काही हिंदु संघटनांनी केला आहे.

त्यामुळे नाटकात सहभागी असलेले अभिनेते आणि लेखक-दिग्दर्शकांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं. तसंच, कला विभागाचे प्रमुख आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;