पशुहत्येला विरोध केल्याने मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

पशुहत्येला विरोध केल्याने मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना आज अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना घडली आहे. या वेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली असून एका चारचाकी वाहनाच्या काचा सुद्धा फोडण्यात आल्या.

देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मढी देवस्थानने तीन वर्षांपूर्वी कानिफनाथ मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली होती. या निर्णया वरून पूर्वी वादही झाले होते. चालू वर्षी सुद्धा मंदिर परिसरात पशुहत्या करू नका, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले होते तर पशुहत्या विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर फिर्यादी अभिषेक मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी, दत्तात्रय वसंत मरकड, राहुल अशोक कुटे हे सोबत असताना आम्हाला दत्तू पाखरे यांच्या शेतात गर्दी दिसल्याने आम्ही शेतात गेलो. त्या ठिकाणी काही अज्ञात इसम उभे होते व त्यांनी एक बोकड कापण्यासाठी आणला होता. त्यांना या ठिकाणी पशुहत्या करू नका असे आम्ही सांगितले असता त्यांनी आम्ही नवस केला असून आम्ही बोकड कापणारच असे सांगत मला चाकूने मारहाण केली तर इतरांनी माझ्या समवेत असलेल्या जगदीश धाडगे, राहुल कुटे, प्रवीण ढवळे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;