लातूर जिल्हा परिषद उपविभाग पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

लातूर जिल्हा परिषद उपविभाग पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

लातूर जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघुपाटबंधारे ग्रामीण पुरवठाचे कनिष्ठ अभियंता वर्ग यांनालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 15 पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील पार येथे पंधराव्या वित्त आयोग जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघुपाट बंधारे ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत प्राप्त निधी मधून पाईपलाईन व नळ कनेक्शन जोडणीचे काम केले होते. या कामापोटीचे बिले काढण्यासाठी बळीराम पंढरीनाथ सोनकांबळे (53 वर्ष) यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पंधरा हजार रुपये आता व उर्वरित रक्कम देयक मिळाल्यानंतर स्वीकारण्याचे पंचासमोर मान्य करून लाचेची रक्कम स्वतः कार्यालयात पंचांसमोर स्वीकारले. यामधील सहाय्यक आरोपी पंडित मच्छिंद्र शेकडे (39 वर्ष) खाजगी इसम व्यवसाय शेती यांनीही लाच देण्यास प्रोत्साहन दिले. म्हणून या दोन आरोपी विरुद्ध अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करणे चालू आहे.

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथील पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई लातूरचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, शिवशंकर कच्छवे, रूपाली भोसले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, संतोष क्षीरसागर यांनी पार पाडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;