भाजप नेत्याच्या मुलाची दांपत्याला बेदम मारहाण, तरुणाचे डोके फोडले

भाजप नेत्याच्या मुलाची दांपत्याला बेदम मारहाण, तरुणाचे डोके फोडले

मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या मुलाने एका दांपत्याला मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीत तरुणाचे डोके फोडण्यात आले आहे. हा नेता म्हणजे राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल असून त्यांच्या मुलाचं नाव अभिज्ञान असं आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहुपुरा येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार अलिशा सक्सेना आणि त्यांचे पती डेनिस मार्टिन यांचं एक हॉटेल आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या हॉटेलसमोर एक गाडी उभी राहिली. त्या गाडीतून काही तरुण बाहेर आले आणि तेथील एका बाईकस्वाराला मारू लागले. अलिशा आणि डेनिस यांनी त्या बाईकस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा त्यातील एका तरुणाने त्यांना शिवीगाळ करत अलिशा यांच्यावर हल्ला केला. त्यापासून अलिशा यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या डेनिस यांना मारहाण करण्यात आली. त्यातील एका तरुणाने लोखंडी सळी आणि कुंडी त्यांच्या डोक्यात घातले. या प्रकरणी दांपत्याने अभिज्ञान याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान, या दांपत्याविरोधात नरेंद्र शिवाजी पटेल यांनी देखील तक्रार दाखल केली आहे. तसंच, शाहुपुरा पोलिसांनी आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला असून वरिष्ठ पोलिसांनी शहानिशा न करता आपल्याच चार पोलीस कर्मचाऱ्यांना ओरडा दिल्याचीही माहिती मिळत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;