देवगड बंदरात नौका बुडाली, एक खलाशी बेपत्ता

देवगड बंदरात नौका बुडाली, एक खलाशी बेपत्ता

देवगड समुद्रात 10 वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली असून या नौकेवरील 8 पैकी 7 खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. ही घटना रविवार 31 मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी रविवार 31 मार्च रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर 10 वाव पाण्यात बोटीच्या तळातील जॉईंटच्या फटीमधून पाणी आत येऊ लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याने बोटीवरील मुख्य तांडेल रमेश धोंडू लाकडे (राहणार गावडे आंबेरी रत्नागिरी), दुसरे तांडेल सर्वेश सदानंद गोयनाक (राहणार गावडे आंबेरी) खलाशी प्रदीप वसंत माळी (राहणार हर्चे लांजा), अनिल शांताराम भडेकर (राहणार चाकण राजापूर), निसार अब्दुल्ला दरवेस(रा. गावखडी रत्नागिरी), जगदीश सखाराम गोटरे (राहणार साखरे राजापूर), संजय सुभाष वाईम (रा.चाकण राजापूर) व नितीन जयवंत कणेरकर (रा. कणेरे राजापूर)यांनी पाण्याची कॅन रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली.

याच दरम्यान मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशी यांना वाचविले. मात्र या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर 43 राहणार कणेरे राजापूर याच्या हातातील कॅन सुटून गेल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलीस यांना मिळतात स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने व पोलीस गस्तीनौका पंचगंगा यांच्या सहाय्याने बेपत्ता खलाश्याची शोध मोहीम दिवसभर सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो मिळालेला नव्हता. या दुर्घटनेत संपूर्ण बोट जाळ्यांसहित नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे . पोलिसांच्या पंचगंगा या गस्तीनौकेतून पीएसआय सोलकर ,तांडेल, दरवेश, शकील अहमद, एएसआय चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, यांनी शोध मोहीम राबविली. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;