बागेश्वर बाबांची जीभ पुन्हा घसरली, जुमदेव महाराजांबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य

बागेश्वर बाबांची जीभ पुन्हा घसरली, जुमदेव महाराजांबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. बागेश्वर बाबा यांनी भंडाऱ्याच्या मोहाडीत शनिवारी संध्याकाळी भागवत सप्ताहाचे पठन केले. यावेळी त्यांनी मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या एका सेवकाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे तेथील बाबा जुमदेव महाराज यांचे भक्त संतापले आहेत. बाबा जमुदेव महाराजांना मानणाऱ्या भाविकांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच बागेश्वर बाबाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी देखील भक्तांकडून केली जात आहे.

नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडाऱ्यातील मोहाडीत करण्यात आले होते. बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात बाबा जुमदेवजी आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यावेळी ते म्हणाले की, नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोला….जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार….रसगुल्ला खात आहेत…मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत. तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.

बागेश्वर बाबांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण विदर्भातील बाबा जुमदेवजी यांच्या भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भंडारा गोंदिया जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्यापही कुठलीही कारवाही झाली नाही. त्यामुळे हजारोच्या संख्येने सेवकांनी मोहाडी पोलीस स्टेशन गाठले आहे. पोलीस स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी झाल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आता पोलीस अधीक्षक यांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द 295 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;