वडीगोद्री हायवेवर भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

वडीगोद्री हायवेवर भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

जालना जिल्ह्यातील  जालना -वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरअपघातांची मालिका सुरूच आहे. येथे आज दुपारी ३ वाजता जालन्यातील धाकलगाव येथे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण
गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली दुचाकी आल्याने दुचाकीचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याखाली येवून कोसळला.

युरियाने लोड असलेला ट्रक क्र.(एम.एच. 26 बी. ई. 2928) हा जालन्याकडुन शहागडकडे जात होता. यावळी धांकलगाव येथे अचानक टायर फुटल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व समोरुन वडीगोद्रीकडून शहापूरकडे येणारी दुचाकी ट्रकच्या टायर खाली आली. त्यामुळे दुचाकीचा अक्षरशा चुराडा झाला आहे. यात दुचाकी स्वार दत्ता
बर्डे (२७) रा.शहापुर ता.अंबड व गणेश गव्हाणे (२८) रा.बनटाकळी ता.अंबड जि. जालना हे दोन जन गंभीर जख्मी झाले. जखमींना उपचारासाठी जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ट्रक चालक हा स्टेरिंगच्या खाली दबल्याने त्याला जेसीपीच्या साहाय्याने  बाहेर काढण्यात आले.तसेच उपचारासाठी या तिघांनाही जालना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;