बिबट्याच्या हल्लात 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, 12 तासांनंतर आढळला मृतदेह; संतप्त ग्रामस्थांनी गाव, शाळा बंद ठेवत नोंदवला निषेध
तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. काल सायंकाळी खारेकर्जुने येथे घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या रियांका पवार या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेले. तब्बल 12 तासांच्या तपासानंतर आज सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळा आणि गाव बंद ठेवून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.
खारेकर्जुने येथे शेतात वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबातील काही सदस्य काल सायंकाळी शेकोटी करून काम करत होते. यावेळी घराजवळ खेळणाऱ्या रियांका पवार हिला शेजारील तुरीच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने उचलून नेले. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, हाती काहीही लागले नाही. गावकऱयांच्या मदतीने वन अधिकाऱयांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली, पण रियांका सापडली नाही. अखेर आज सकाळी रियांकाचा मृतदेह हिंगणगाव रस्त्यावर शाळेपाठीमागे आढळून आला. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List