मुजफ्परपुरमध्ये हृदयद्रावक घटना! एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू तर चार जण गंभीर
बिहारच्या मुजफ्परपुरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून घरात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर चार जणांची अवस्था गंभीर आहे,. आग आगली त्यावेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले होते, त्यांना वाचविण्याची संधीही मिळाली नाही.
ही घटना मोतीपूरच्या वॉर्ड नंबर 13 मधील आहे, शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली. घरातील सर्व झोपले असल्यामुळे बाहेर काढण्यासाठी त्यांना संधीही मिळाली नाही. आणि बघता बघता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्छानी गेले.
आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे पाहून स्थानिकांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी गर्दी जमली. लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इतकी भीषण होती की ती नियंत्रित करणे कठीण झाले. पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी भाजलेल्या चार जणांना वाचवले आणि त्यांना उपचारासाठी एसकेएमसीएच रुग्णालयात पाठवले. या अपघातात लालन साह, त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले यांचा मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात या घटनेवर शोककळा पसरली आहे.
डीएसपी वेस्टर्न सुचित्रा कुमारी म्हणाल्या, “मोतीपूरमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चार जण भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List