जम्मू कश्मीर हादरले! नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, 7 ठार; 30 गंभीर जखमी
दक्षिण श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशननमध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 7 जण ठार झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की मृतांच्या शरीराचे अवशेष 30 फूट दूर पडलेले सापडले आहेत. हा दहशतवादी हल्ला आहे की पोलीस स्टेशनमधील स्फोटकांचा विस्फोट झाला याचा सध्या तपास सुरू आहे.
शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटानंतर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा एक भाग कोसळला व त्या जागी मोठी आग लागली. या स्फोटात 7 जण ठार झाले तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List