ज्येष्ठ पर्यावरणवादी, ’पद्मश्री’ थिम्मक्का यांचे निधन
ज्येष्ठ पर्यावरणवादी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सलुमरदा थिम्मक्का यांनी बंगळुरू येथील एक खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 114 वर्षांच्या होत्या. थिम्मक्का यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
थिम्मक्का यांचा जन्म 30 जून 1911 रोजी तुमकुरू जिह्यातील गुब्बी या गावात झाला होता. त्यांनी बंगळुरू दक्षिण जिह्यात 4.5 किलोमीटर अंतरावरील पट्टयात वडाची 385 झाडे लावली होती. त्यामुळे त्यांना ’सालुमरदा’ ही उपाधी मिळाली होती. झाडांना त्या अपत्याप्रमाणे जपत. त्यांनी कर्नाटकमध्ये अनेक दशके वृक्षारोपणाचे मोठे कार्य केले. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित केले होते. त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांचा 12 पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List