घाटी रुग्णालयात जादूचा प्रयोग… एकाच रुग्णाचे दोन रक्तगट !

घाटी रुग्णालयात जादूचा प्रयोग… एकाच रुग्णाचे दोन रक्तगट !

घाटी रुग्णालय म्हणजे अजायबघरच ! येथे नित्य नवीन जादूचे प्रयोग होत असतात. आता एकाच रुग्णाचे दोन रक्तगट असल्याचा प्रयोग घाटीने केला आहे. चिठ्ठी देणारे तेच, तपासणारे तेच आणि कारवाई करणारेही तेच. त्यामुळे तेरी भी चूप… मेरी भी चूप असा हा प्रकार ! वडगाव कोल्हाटी येथील येडू मनाळ (७५) यांना मंगळवारी आजारी असल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताची कमी असल्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रक्त तपासले आणि चिठ्ठी देऊन घाटीतीलच रक्तपेढीतून रक्तपिशवी आणण्यास सांगितले. चिठ्ठीवर मनाळ यांचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ लिहिलेला होता. मात्र रक्तपेढीत त्या गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनाळ यांच्या नातलगांनी चिठ्ठी आणि रक्तनमुना घेऊन लायन्स ब्लड सेंटर गाठले. तेथे रक्ताचा नमुना तपासला असता रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले. रक्तगटच बदलल्याने लायन्स ब्लड सेंटरने चिठ्ठी बदलून देईपर्यंत रक्तपिशवी देण्यास नकार दिला.

मनाळ यांचे नातलग पुन्हा घाटी रुग्णालयाच्या रक्तपेढीत आले. तेथे पुन्हा रक्तगट तपासण्यात आला. तेव्हा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’च असल्याचे स्पष्ट झाले. मग अगोदर केलेली तपासणी आंधळेपणाने केली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार रुग्णाच्या जीवाशी खेळ करणार असल्याचा आरोप करत सोमनाथ मनाळ यांनी या प्रकरणी घाटी अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. घाटीचे शिस्तप्रिय अधीक्षक रक्तगट बदल प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Parth Pawar land scam – विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, केली ‘ही’ मागणी Parth Pawar land scam – विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, केली ‘ही’ मागणी
पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खासगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून,...
10 हजारात लोकशाही विकली जाते हे बिहारमध्ये दिसले, संजय राऊत यांचा निशाणा
IND vs SA Kolkata Test – शुभमन गिलने अचानक मैदान सोडलं, बॅटिंग करताना नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Delhi bomb blast – चारही दहशतवादी डॉक्टरांची प्रॅक्टिस कायमची बंद, NMC ने रजिस्टरमधून नावेही हटवली
रांचीमध्ये दुर्देवी घटना! हटिया धरणात न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तिघांचा बुडून मृत्यू तर एक जण बेपत्ता
घाटी रुग्णालयात जादूचा प्रयोग… एकाच रुग्णाचे दोन रक्तगट !
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – प्रभाग आरक्षणात धक्का बसलेल्या दिग्गजांचा मोर्चा शेजारच्या प्रभागावर