डेरवण युथ गेम्समध्ये एम स्पोट्स फाऊंडेशनची पदकांची लयलूट
कोकणचे आँलिम्पिक अशी ओळख असलेल्या डेरवण युथ गेम्स स्पर्धेत ठाण्याच्या एम स्पोस्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. या फाऊंडेशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 14 सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तर ऐकट्या शौर्या अंबुरे हिने चार सुवर्ण पदकांची लयलूट करत फाऊंडेशनच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
चिपळून येथे नुकतीच 10वी डेरवण युथ गेम्स हि स्पर्धा पार पडली. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील पाच हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुलींची लक्षणिक संख्या हि यावेळच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. 12, 14, 16 आणि 18 वयोगटात खेळवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये मुलींची कामगिरी कौतुकास्पद ठरली. तर ठाण्याच्या एम स्पोस्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी आपल्या जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. उपायुक्त रुपाली अंबुरे यांची कन्या व एम स्पोस्ट्स फाऊंडेशनची स्टार धावपटू शौर्या अंबुरे हिने स्पर्धा गाजवली. तिने 60 मी, 100 मी, 80 मी अडथळा आणि 4*100 मी रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत चार सुवर्ण पदक पटकावले. तर मुलांच्या 12 वर्षाखालील 60, 100 आणि 200मीटर स्पर्धैत युग पाटील याने सुवर्ण धाव घेतली. एकंदरीत एम स्पोस्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी डेरवण युथ गेम्स स्पर्धेत पदकांची लयलुट करत सर्वांचीच वाहवा मिळवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List