भाजपची मानसिकता महिला व दलित विरोधी, मोदींच्या ‘त्या’ फोटोवरून काँग्रेसची टीका
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे प्रकृतीच्या कारणास्तव शनिवारी भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार प्रदान सोहळ्यातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात राष्ट्रपती मुर्मू या आडवाणींच्या बाजूला उभ्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुर्चीत बसलेले आहेत.
देश की महामहिम राष्ट्रपति खड़ी हैं और PM मोदी बैठे हैं।
एक बार फिर PM मोदी ने जानबूझकर आदिवासी महिला राष्ट्रपति का अपमान किया है।
यह पहली बार नहीं है- जब नई संसद का उद्घाटन हुआ तब उन्हें बुलाया नहीं गया और राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम में भी राष्ट्रपति जी नहीं दिखीं।… pic.twitter.com/pbH2aR5CT4
— Congress (@INCIndia) March 31, 2024
या फोटोवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसलेले आहेत. पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी आदिवाली महिला राष्ट्रपतीचा अपमान केला आहे. हे पहिल्यांदा झालेले नाही. संसद भवनाच्या उद्घाटनाला त्यांना बोलावले नव्हते. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपती दिसल्या नाहीत. या घटना दाखवतात की पंतप्रधान मोदी व भाजपची मानसिकता ही महिला व दलित विरोधी आहे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना शनिवारी मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांनी हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List