138 जणांवर कारवाई, 7 दारू अडड्यांवर धाडी; निवडणूकीत शांतता राखण्यासाठी पोलीस दलाची मोहिम सुरू
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता भंग होऊ नये याकरिता 138 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 10 संशयास्पद व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील 7 अवैध दारूधंद्यावर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
आचारसंहिता लागू होताच निवडणूकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाने कडक मोहिम राबवली आहे. निवडणूकीच्या काळात शांतता भंग होऊ नये याकरिता पोलिसांनी 138 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दारूअड्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात हातभट्टी दारूचे अड्डे आहेत. त्या दारू अड्ड्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. आतापर्यंत 7 दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
निवडणूकीच्या काळात सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी एखाद्या व्यक्तींबद्दल बदनामीकारक मजकूर सोशल मिडियावर प्रसारित होऊन वातावरण बिघडू शकते. तशी घटना घडू नये याकरिता सोशल मिडियावर पोलीस 24 तास लक्ष ठेऊन आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List