छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी

छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी

मिंधे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून पुन्हा सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने 2016मध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 2021 मध्ये सबळ पुरावे नसल्याचे सांगत छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली. छगन भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीरसह पाच जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलेले. यानंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.

गेल्या दीड वर्षांपासून भुजबळ यांच्या विरोधातील याचिकेला तारिख मिळत नव्हती. त्यामुळे अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी उभे केले जाणार आहे.

अंजली दमानिया यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ”महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. 5 न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक 12 वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.” असं ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;