ताटातुट झालेल्या माय लेकीला पुन्हा एकत्र केले, बेपत्ता झालेली दोन वर्षांची चिमुकली आईच्या कुशीत विसावली

खेळण्याच्या धुंदीत दोन वर्षांची चिमुकली भरकटली. खेळता खेळता आईच्या नकळत ती दूर निघून गेली. बराचवेळ झाला तरी मुलगी कुठे दिसत नसल्याने तिच्या आईच्या हदयाचा ठोका चुकला. मुलीचा शोध घेऊ लागली पण मुलीचा काही थांगपत्ता लागेना. भोईवाडा पोलिसांकडे प्रकरण गेलं. पोलिसांनी कसून शोध घेत अखेर ताटातूट झालेल्या त्या माय लेकीला पुन्हा एकत्र केलं.

गुरूवारची दुपारची वेळ, के ई एम इस्पितळाच्या गेट क्रमांक 3 येथून चांदणी भवार (24) या महिलेची दोन वर्षांची मुलगी अचानक गायब झाली. बराचवेळ होऊनही मुलगी आजूबाजूला कुठे दिसत नसल्याने शोधाशोध करूनही ती सापडत नव्हती. त्यामुळे कासाविस झालेल्या चांदणी हिने भाईवाडा पोलीस ठाणे गाठले. मुलीला कोणीतरी उचलून नेले अशी तक्रार त्यांनी दिली. तक्रारीची तत्काळ गंभीर दखल घेत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक नरेंद्र पाटील व पथकाने मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांनी कसून शोध सुरू केला पण काहीच फायदा होईना. अखेर पोलिसांनी ठिकठिकाणी मुलीचे छायाचित्र चिकटवून सदरची मुलगी कुठे दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले. पोलीस प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. अखेर आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. वाडिया इस्पितळाजवळ चिमुकली एकटीच फिरताना पोलिसांना सापडली. मुलगी सुखरुप हाती लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर आवश्यक कार्यवाही करून पोलिसांनी मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. गरीब आणि फुटपाथवर राहणारे असूनही पोलिसांनी कुठलाही दुजाभाव न करता मुलीचा शोध घेऊन आमच्या स्वाधीन केले असे म्हणत चांदणी व तिच्या पतीने पोलिसांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;