निलेश लंके यांची सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा; मोहटादेवी गडापासून होणार सुरुवात

निलेश लंके यांची सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा; मोहटादेवी गडापासून होणार सुरुवात

नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सोमवारापासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करणार आहेत. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेला सुरुवात होणार आहे.

नगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याआधी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा काढली होती. त्यानंतर आता निलेश लंके हे सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत. मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक अंकुश काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. लंके प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगर लोकसभा मतदारसंघांतील तालुके आणि गावात ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके जनतेची संवाद साधणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;