चारशे पार सोडा, आधी 200 पार जाऊन दाखवा! ममता बॅनर्जींचं भाजपला खुलं आव्हान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत चारशे पारच्या आकड्यावरून आव्हान दिलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी बंगालच्या कृष्णानगर येथे दाखल झाल्या होत्या. त्यावेळी झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
काही दिवसांपूर्वी ममता यांना एका अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीनंतर प्रचारसभेत सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. कृष्णानगर येथे प्रचारभेत बोलताना ममता म्हणाल्या की, भाजप म्हणतोय की 400 पार जाणार. मी त्यांना आधी 200 पार जाऊन दाखवा असं आव्हान देते. 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अशाच 200 हून अधिक जागांच्या बढाया मारल्या होत्या, पण त्यांना 77 जागांवरच थांबावं लागलं होत, अशी खिल्ली उडवत ममता बॅनर्जी यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं.
महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यावरूनही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या की, आमच्या खासदार महुआ मोईत्रा यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचून त्यांना लोकसभेतून निष्कासित केलं. कारण, त्या भाजपवर टीका करण्यात आघाडीवर होत्या, म्हणूनच हे कारस्थान रचण्यात आलं, अशी टीका ममता यांनी यावेळी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List