संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; राहूल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघीडीच्या महारॅलीत भाजप सरकारवर तोफ डागली. आता होणारी लोकसभा निवडणूक ही फक्त मतांसाठी होणारी निवडणूक नाही. ही देश आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. त्यासाठी त्यांचा मॅच फिक्सिंगचा प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेने आता योग्य विचार करत मतदान करण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
काही क्रिकेट मॅच फिक्सिंग करण्यात येतात. तसेच ही लोकसभा निवडणूक भाजपकडून फिक्स करण्याचे प्रयत्न होत आहेत. या निवडणुकीसाठी अंपायर मोदी यांनी निवडले आहेत. निवडणुकीआधी आमच्या दोन खेळाडूंना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत मॅच फक्सिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएमशिवाय त्यांच्या 180 जागाही येणार नाही. त्यामुळे मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करत 400 पारच्या घोषणा ते देत आहेत. मॅच फिक्सिंगसाठी निवडणुकीच्या आधी दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. आम्ही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहोत, असे असताना निवडणुकीच्या काळात आमची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. नेत्यांना पैसे देत धमकावण्यात येते. फोडफोडी करत सरकार पाडण्यात येते. ही मॅचफिक्सिंग नरेंद्र मोदी आणि देशातील तीनचार अब्जाधीश उद्योगपती करत आहेत. देशाचे संविधान बदलण्यासाठीच ते सर्व करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिगचा प्रयत्न करत आहे. ईव्हीएमशिवाय, दबावतंत्राचा वापर केल्याशिवाय ते 180 पर्यंतही पोहचू शकत नाहीत. निवडणुकीपूर्वी आमची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. निवडणुका तोंडावर असताना देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या खर्चाला मर्यादा येणार आहेत. कोणत्याही पक्षांनी निवडणुकीत उतरू नये, यासाठीच हे करण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. ही मॅच फिक्सिंग देशाचे संविधान बदलण्यासाठी करण्यात येत आहे. आपल्या देशाच्या संविधानाने गरीबांना हक्क दिले, जगण्याचा अधिकार दिला. ते संविधान बदलण्यासाठीच ही मॅच फिक्सिंग करण्यात येत आहे. ज्या दिवशी संविधान संपेल, त्या दिवशी देशही वाचणार नाही. हा देश धमक्या देत चालवला जाऊ शकत नाही. संविधान म्हणजे जनतेचा आवाज आहे. संविधान संपल्यावर देश एकसंघ राहणार नाही. देश प्रांताप्रातात विभागला जाईल. पोलीस, ईडी, सीबीआय यांचा वापरर करून दबावतंत्राने देश चालवू, असे त्यांना वाटते. मात्र, जनतेचा आवाज दाबला जाणार नाही. निवडणुका जिंकल्यावर संविधान बदलण्यात येईल, असे वक्तव्य भाजपच्या खासदाराने केले. त्यामुळे संविधान आणि देश धोक्यात आहे. त्यामुळे संविधान आणि देश वाचवण्याची ही लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संविधान नष्ट झाल्यावर गरीबांचे धन, हक्क चीनचार लोकांच्या हातात जातील. नोटबंदी आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य लोकांना काय फायदा झाला, एक टक्का लोकांकडे सर्वाधिक धन आहे. आता गरीबांचे धनही त्यांना हवे आहे, त्यामुळे त्यांना संविधान बदलायचे आहे. जातिनिहाय जनगणना, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या देशासमोरील महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे जनतेने योग्य विचार करून मतदान करणे गरजेचे आहे. भाजपकडून होणारी मॅचफिक्सिंग देशाला दिसत आहे. निवडणुकीच्या काळातच दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत, आमची बँक खाती बंद केली. या घटना सहा महिने आधी किंवा नतंर करता आल्या असत्या. मात्र, मॅचफिक्संग करण्यासाठी निवडणुकीच्या काळातच त्यांनी या गोष्टी केल्या. मॅचफिक्सिंग करून भाजप जिंकला तर देश पेटेल, देशात अराजता माजेल. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. देश आणि संविधान वाचवण्याची ही लढाई आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे, असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List