धक्कादायक….शाळेत पाण्याच्या बादलीला हात लागल्याने दलित मुलाला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
राजस्थानच्या अलवारमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेच्या आवारात असलेल्या हातपंपावर पाणी पिण्यासाठी एक दलित मुलगा गेला होता. त्यावेळी पाणी घेताना त्या दलित मुलाचा हात शेजारी ठेवलेल्या बादलीला लागला. ती बादली गावातील रतीराम ठाकूर याची होती. तो हातपंपावर पाणी भरत होता. आम्ही उच्चवर्णीय असून तू माझ्या बादलीला हात का लावला, अशी विचारणा करत त्याने मुलाला बेदम मारहाण केली.
राजस्थानमधील अलवरमध्ये मंगलेशपूर येथील शाळेत ही घटना घडली आहे. या शाळेत चौथीत शिकणारा 8 वर्षांच्या मुलाला चिरागला तहान लागल्याने तो शाळेतील आवारात असलेल्या हातपंपावर पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी हातपंपावर गावातील रतीराम ठाकूर पाणी भरत होता. चिरागने पाणी पिण्यासाठी हातपंपाजवळील ठाकूरची बादली हटवली. त्यामुळे ठाकूर संतापला. आम्ही उच्चवर्णीय असून तू माझ्या बादलीला हात का लावला, असा सवाल करत ठाकूरने चिरागलाबेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
ठाकूरने केलेल्या मारहाणीने जखमी झालेला चिराग घरी पोहचला आणि घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्याच्या कुटुंबियांनी ठाकूरला याबाबत विचारणा केली असता तुम्ही माझ्यासारख्या उच्चवर्णीयाला विचारणा कशी करता, असा सवाल करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चिरागच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.
मुख्याध्यपकांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने चिरागच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकारची माहिती देत रतीराम ठाकूरविरोधात तक्रार नोंदवली.आरोपीविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.तसचे मारहाणीत जखमी झालेल्या चिरागला औषधोपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List