हिंदुस्थानी नौदलाने 23 पाकिस्तानींना वाचवले

हिंदुस्थानी नौदलाने 23 पाकिस्तानींना वाचवले

 

हिंदुस्थानी नौदलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई करत इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरीत्या सोडविले आहे. हिंदुस्थानी नौदलाने शुक्रवारी उशिरा याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे या जहाजावर 23 पाकिस्तानी नागरिक होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी हिंदुस्थानी नौदलाने 12 तासांचे ऑपरेशन राबवले. गुरुवारी संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासेमारी करणाऱया अल पंबार 786 या जहाजाचे अपहरण केल्याची माहिती मिळाली होती.  शुक्रवारी सकाळी आयएनएस सुमेधने अल पंबार 786 जहाजाला सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 90 नॉटीकल माईलवर रोखले. काही वेळातच आयएनएस त्रिशूलदेखील या ठिकाणी दाखल झाले. अखेर 12 तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी हिंदुस्थानी नौदलाकडे आत्मसमर्पण केले. तसेच या बोटीवरील 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;