चार पोपटांचे तिकीट 444
बंगळुरूतून म्हैसूरला निघालेल्या कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसमध्ये एक अजब प्रकार घडला. पंडक्टरने चक्क चार पोपटांचे तिकीट आकारले असून हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. झाले असे की, एक महिला आपल्या नातीसोबत प्रवास करत होती. त्यांच्यासोबत असलेल्या पिंजऱयामध्ये चार पोपट पैद होते. कर्नाटकातील शक्ती योजनेनुसार राज्यात महिलांना बस प्रवास मोफत आहे. त्यामुळे महिला आणि छोटय़ा मुलीला तिकीट काढावे लागले नाही. पण पंडक्टरने त्यांच्यासोबत असलेल्या चार पोपटांना प्रवासी म्हणून गृहीत धरत प्रत्येकी 111 रुपयेप्रमाणे 444 रुपये आकारले. यासंदर्भातील तिकिटाचा पह्टो आणि पोपटांसोबत प्रवास करणाऱया महिला-मुलीचा पह्टो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळय़ा प्रतिक्रिया देत आहेत.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शहर, उपनगर आणि ग्रामीण मार्गांसह नॉन-एसी बसेसमध्ये पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करण्याची परवानगी देतात. जे प्रवासी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट काढत नाहीत त्यांना प्रवासाच्या तिकीट किमतीच्या 10 टक्के दंड आकारला जातो. तसेच कंडक्टर पाळीव प्राण्यांसाठी अर्धे तिकिटे देत नसतील, तर त्यांच्यावर फिर्याद दाखल केली जाऊ शकते आणि कर्नाटक परिवहन महामंडळ निधीच्या गैरवापरासाठी त्यांना स्थगितदेखील केले जाऊ शकते. त्यामुळे कंडक्टरने महिलेला चार पोपटांचे तिकीट काढण्यास सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List