संकष्ट चतुर्थी दिवशीच महायुतीच्या मेळाव्यात मांसाहारी जेवणावळी; भाजप उमेदवाराने मारला मटणावर ताव

संकष्ट चतुर्थी दिवशीच महायुतीच्या मेळाव्यात मांसाहारी जेवणावळी; भाजप उमेदवाराने मारला मटणावर ताव

भाजपच्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चक्क संकष्टी चतुर्थी दिवशीच मांसाहारी जेवणावळी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या महायुतीच्या या मेळाव्यात स्वतः निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांसमवेत बसून मटणावर ताव मारला असल्याची चर्चा आता सुरू आहे.

गुरुवार हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी संकष्टी चतुर्थी होती. हे माहीत असूनही या दिवशीच भाजप उमेदवाराने मांसाहारी जेवणाच्या पंगती बसविल्याने सांगोला विधानसभा आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आतापासूनच लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मोहिते-पाटलांनी सांगोला तालुक्यात दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही सांगोला येथे महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह मिंधे गट, अजित पवार गट आणि भाजप पदाधिका ऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सूचना आणि तक्रारी मांडल्या. मात्र, या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांसह रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मटणावर ताव मारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;