कळंबा कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी घेतली गंभीर दखल

कळंबा कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी घेतली गंभीर दखल

खुनाच्या गुह्यात संशयित आरोपी असलेल्या वृषभ ऊर्फ मगर विजय साळोखे (वय 21, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी दहशत पसरवण्यासाठी त्याची मोटारीतून काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी वृषभ साळोखेसह अनिकेत किरण शिरदवाडे, पृथ्वीराज ऊर्फ माम्या विलास आवळे (दोघे रा. वारे वसाहत), अवधूत किरण खटावकर (रा. हनुमाननगर), धीरज राजेश शर्मा, रोहित चौगुले (रा. जगतापनगर, तिघेही रा. पाचगाव), आदित्य कांबळे, विजय साळोखे (दोघे रा. रामानंदनगर) अशा आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील शिरदवाडे आणि खटावकर यांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल सागर विलास डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ साळोखे हा एका खुनाच्या गुह्यात संशयित आरोपी असून, त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृहातून 19 मार्चला बाहेर येताच, त्याच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर त्याचे स्वागत करून दुचाकी व चारचाकीतून मिरवणूक काढली. गुंडांच्या या मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून विरोधी गटावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;