पुणे-सातारा मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्री; 1 एप्रिलपासून आणेवाडीच्या टोलमध्ये वाढ

पुणे-सातारा मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्री; 1 एप्रिलपासून आणेवाडीच्या टोलमध्ये वाढ

सातारा-पुणे अथवा पुणे-सातारा प्रवास करणा ऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पी. एस. टोल रोड प्रा. लि. व महामार्ग प्राधिकरणाने टोलवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, 1 एप्रिलपासून सुधारित टोलवाढ लागू केली जाणार आहे.

टोल रोड प्रा. लि. व महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी टोलचे दर वाढत असतात. यंदादेखील टोलमध्ये दरवाढ करण्यात आली असून, आनेवाडी टोलनाक्यावरून ये-जा करताना आता वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या मोटार वाहनांकडून एका बाजूच्या प्रवासाकरिता 80 रुपये टोल आकारला जाणार आहे. तर हलके व्यावसायिक वाहन किंवा मिनी बससाठी 135 रुपये, बस किंवा ट्रकसाठी 280 रुपये, जड बांधकाम मशिनरी किंवा मल्टी ऍक्सल वाहनांसाठी 435 रुपये, तर मोठय़ा आकाराच्या वाहनांसाठी 530 रुपये टोल आकारला जाणार आहे. टोलनाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघात राहणा ऱ्या स्थानिक नागरिकांना मासिक पाससाठी 340 रुपये मोजावे लागणार आहेत. महामार्गामुळे दळणवळण अधिक गतिमान झाले. परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून प्रवाशांना पायाभूत सेवा-सुविधांची पूर्तता केली जात नसल्याची ओरड प्रवाशांमधून वारंवार केली जाते. अशा परिस्थितीत टोल दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना काहीअंशी फटका बसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;