रामदेव बाबांनी सांगितलेले सकाळचे वार्मअप एक्सरसाईज करा आणि फिट राहा
निरोगी राहण्यासाठी नेहमी योग्य लाईफस्टाईल स्वीकारणे गरजेचे आहे. यात आहारापासून व्यायामाला सर्वाधिक महत्व आहे. आजच्या काळात अनेक लोक डेस्कचा जॉब करतात. ज्यात केवळ एकाच ठिकाणी बसून तासनतास लॅपटॉपचा उपयोग करत रहातात. त्यामुळे आपल्या खुर्चीवरुन उठणे आणि बाहेर फिरायला जाणे यासाठी अजिबात वेळ काढू शकत नाही.एकाच जागी बसून काम केल्याने डोकेदुखी, खांदे किंवा कंबरदुखी आणि या सारख्या अनेक समस्यांचा धोका वाढू शकतो. अशात या पासून आपल्या शरीराला एक्टीव्ह ठेवणे आणि योग्य लाईफस्टाईल स्वीकारणे खूप गरजेचे आहे.
तुम्ही जर स्वत:साठी दिवसभर वेळ काढू शकत नसाल तर सकाळी-सकाळी काही मिनिटे काढून काही वेळ एक्सरसाईड वा वार्मअप करु शकता. पतंजली फाऊंडर आणि योग गुरुबाबा रामदेव यांनी देखील वॉर्मअप करणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर रोज सकाळी काही वार्मअम करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर या संदर्भात जाणून घेऊया…
सकाळसाठी वार्मअप एक्सरसाईज
योग गुरु रामदेव बाबा यांनी यौगिक जॉगिंगचे किमान दोन अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्यांना सुर्यनमस्कार करता असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. जर सुर्यनमस्कार करता येत नसेल तर ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, त्रिकोणासन, कोणासन, पादहस्तासन आणि सुक्ष्म म्हणजे हल्के व्यायाम करावेत,त्यांना आपल्या क्षमतेनुसार करण्याचा सल्ला दिला आहे.
रामदेव बाबांनी सांगितले की आजारी, रुग्ण आणि विकारांच्या समोर हार मानू नये. त्याऐवजी प्रत्येक प्रकारचे आजार, अंधकार, विकार आणि दुर्बलतेला उखडून फेकण्याचे साहस दाखवावे. व्यायाम, योगासन आणि प्राणायमला लक्ष पूर्वक आणि नियमितरुपाने करणे खूपच फायद्याचे असते. ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, त्रिकोणासन, कोणासन आणि पादहस्तासन हे सर्व आसन महत्वाचे आहेत. हे सर्व आसने शरीराला स्ट्रेच करणे, वार्मअप करणे आणि योगासाठी तयार करण्यास सहायक असतात. यांचा अभ्यासाला योगाची सुरुवात देखील म्हणता येते.
प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार व्यायाम, योगासन वा वार्मअपचा अभ्यास करायला हवा. त्यांनी सांगितले की जर तुम्ही अडचणीमुळे व्यायाम करु शकत नसाल तर योगिक जॉगिंग, सुर्य नमस्कार, दंड-बैठक आणि हलके व्यायाम करु शकता. जर हे सर्व शक्य नसेल तर किमान पाच ते सात प्रकारचे व्यायाम आणि पाच ते सात प्रकारचे प्राणायम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्याची निवड आपली क्षमतेनुसार केली पाहिजे.
योग करण्याचे फायदे
योगाला आज संपूर्ण जग आपलेसे करत आहे. यामुळे केवळ फिजिकल हेल्थ नव्हे तर मेंटल हेल्थ देखील चांगली होण्यास मदत मिळते. तसेच पोश्चरमध्ये सुधार होतो. कॉन्सेट्रेशन वाढते, झोप चांगली येते, शरीराला एनर्जी मिळते. आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांचा बचाव केला जाऊ शकतो. प्राणायम केल्याने स्ट्रेसला कमी करणे, फुप्फुसाची क्षमता वाढवणे आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राखण्यात मदत मिळते. यासाठी आपल्या शराराची क्षमता आणि गरजेनुसार तुम्ही योगासन करु शकता. सुरुवात तुम्ही सोप्या योगासने किंवा वॉर्मअपने करु शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List