स्लीपर वंदे भारत 180 किमी वेगाने धावली!

स्लीपर वंदे भारत 180 किमी वेगाने धावली!

स्लीपर वंदे भारतची चाचणी सध्या सुरू असून कोटा येथील स्लीपर वंदे भारत ताशी 180 किमी वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे. ही ट्रेन स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवली असून या ट्रेनची चाचणी 2 ते 17 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येत आहे. या चाचण्यांमधून ट्रेनची तांत्रिक कार्यक्षमता, ब्रेकिंग, स्थिरता आणि विद्युत सिस्टमची तपासणी केली जात आहे. या ट्रेनच्या सवाई माधोपूर-कोटा-नागदा मार्गावर चाचण्या घेतल्या जात आहेत. 16 डब्यांची ही ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगाने चालवली जात आहे. शिवाय 800 टन रॅक लोड आणि अतिरिक्त 108 टन लोडसह या ट्रेनची चाचणी केली जात आहे. 10 सदस्यांची टीम चाचण्यांवर देखरेख करत आहे.

ट्रेनमध्ये 3 एसी कोच

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी कोच असतील. फर्स्ट एसीमध्ये 24 बर्थ, सेकंड एसीमध्ये 47 बर्थ आणि थर्ड एसीमध्ये 72 बर्थ असतील. एकूण 16 कोचमध्ये 1,128 बर्थ असतील. यापैकी 24 बर्थ कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर… हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…
 टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर...
दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू
माली येथून पाच हिंदुस्थानींचे अपहरण; अल-कायदा व इसिसवर संशय
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?
अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला
प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते 6 तास उशीर