प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
सध्या सीएनजीवर चालणाऱया वाहनांना मोठी पसंती आहे. यामागे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे, परंतु प्रवासात अचानक सीएनजी संपले तर काय कराल.
सीएनजी कारमध्ये पेट्रोलचा एक टँक असतो. त्यामुळे तुमच्या वाहनामधील सीएनजी प्रवास करताना अचानक संपला तर सीएनजीवरून गाडी आपोआप पेट्रोलवर स्विच होते.
जर तुमच्या गाडीत पेट्रोल नसेल किंवा तुम्हाला सीएनजी भरायचा असेल तर जवळील सीएनजी पंप शोधण्यासाठी तुम्ही काही अॅप्सची मदत घेऊ शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
सीएनजी संपल्यावर गाडीला पेट्रोलवर चालवल्याने इंजिनच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास लवकर सीएनजी भरण्याचा प्रयत्न करा.
ज्या रस्त्यावर तुमची कार सीएनजी संपल्यामुळे बंद पडली असेल, त्या ठिकाणी जवळपास सीएनजी पंप नसेल, तर तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरू शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List