पालघरमधील 1 लाख 16 हजार मतदार ठरवणार 4 नगराध्यक्ष, 94 नगरसेवक; निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना वेग

पालघरमधील 1 लाख 16 हजार मतदार ठरवणार 4 नगराध्यक्ष, 94 नगरसेवक; निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना वेग

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांनीदेखील फिल्डिंग लावली आहे. पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषद व एक नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. १ लाख १६ हजार ६६० मतदार ४ नगराध्यक्ष व ९४ नगरसेवक ठरवणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे. पालघर, डहाणू, जव्हार या नगरपरिषद तर वाडा नगरपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. पालघर नगरपरिषदेमध्ये १५ प्रभाग असून ५६ मतदान केंद्रांतून ३० नगरसेवक द्यायचे आहेत. डहाणू नगरपरिषदेमध्ये १३ प्रभाग असून ४१ मतदान केंद्रांतून २७ नगरसेवक निवडून जाणार आहेत. जव्हार नगरपरिषदेमध्ये १० प्रभाग असून ११ मतदान केंद्रांतून २० नगरसेवक निवडले जातील. तर वाडा नगरपंचायतमध्ये १७ प्रभाग असून १७ मतदान केंद्रांतून १७ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.

पालघर नगरपरिषदेमध्ये ५५ हजार ७२७, डहाणू नगरपरिषदेत ३८ हजार ६९३, जव्हार नगरपरिषदेत ९ हजार ३४७ तर वाडा नगरपंचायतीमध्ये १२ हजार ८९३ असे जिल्ह्यात १ लाख १६ हजार ६६० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ४ नोव्हेंबरला आचारसंहिता लागू करण्यात आल्याने निवडणूक स्वच्छ व पारदर्शक भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे.

भरारी पथके, तक्रार निवारण कक्ष

पालघर नगरपरिषदेमध्ये ३०, डहाणूत २७, जव्हारमध्ये २० तर वाडा नगरपंचायतीमध्ये १७ सदस्य संख्या आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी यंत्रणा तयारी करीत असून भरारी पथके नेमली आहेत. काही मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग तसेच सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्षदेखील तयार केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मुख्यमंत्री म्हणाले विषय गंभीर; चौकशी करून वास्तव…”, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया “मुख्यमंत्री म्हणाले विषय गंभीर; चौकशी करून वास्तव…”, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड...
गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
पुन्हा एकदा निर्लज्जपणे… अटल सेतूच्या भ्रष्ट कामावरून आदित्य ठाकरे यांचा मिंधे, भाजप व MMRDA वर निशाणा
पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले; उद्धव ठाकरे कडाडले, दगाबाज सरकारचा श्वास कोंडण्याचं आवाहन
लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग असेल तर अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण! ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक मोठा निर्णय
हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…
दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू