प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; प्रवासी संघटनांची मागणी

प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; प्रवासी संघटनांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱयांनी पुकारलेले आंदोलन आणि त्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत दोघा प्रवाशांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या तसेच प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.

गुरुवारी सायंकाळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ या संघटनेच्या रेल्वे कर्मचाऱयांनी सीएसएमटी स्थानकात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. मुंब्रा अपघात प्रकरणातील रेल्वे अभियंत्यांविरोधातील एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरल्यामुळे शुक्रवारी प्रवासी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आंदोलनाचा लोकल सेवेवर परिणाम झाला आणि त्यादरम्यान नाहक बळी गेलेल्या प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते उमेश विशे यांनी केली. प्रवाशांना वेठीस धरून प्रश्न सुटणार नाहीत. असे असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आंदोलन केले आणि दोन प्रवाशांचे बळी गेले. प्रवाशांच्या मृत्यूला आंदोलन करणारी संघटनाच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.

प्रवाशांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे कर्मचाऱयांनी ऐन गर्दीच्यावेळी केलेल्या आंदोलनाचा फटका असंख्य कर्मचाऱयांना बसला असून या गोंधळानंतर सुटलेल्या लोकलने पाच जणांना उडवले. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत एका वकिलाने हायकोर्टाला याबाबत पत्र लिहिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या…. हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….
बाजारात अनेक प्रकारचे खजूर येतात, ज्यांच्या चवीत थोडा फरक दिसून येतो. त्याच्या पौष्टिक मूल्याबद्दल बोलायचे झाले तर गुणवत्तेच्या बाबतीत थोडा...
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश….
पार्थ पवारांच्या जमीन खरेदीसाठी पैसा आला कुठून? एफआरमध्ये नाव का नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
बाबा सिद्दीकींचा ठावठिकाणा मोहित कंबोज यांनी हल्लेखोरांना सांगितला, शहझीन सिद्दीकींचा खळबळजनक आरोप
परभणीतील शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
“मुख्यमंत्री म्हणाले विषय गंभीर; चौकशी करून वास्तव…”, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश