लोडरची मुलगी सीए झाली…भारतीय कामगार सेनेकडून गौरव
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार कार्गो येथील स्काय हाय एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. युनिटमध्ये लोडर म्हणून काम करणाऱ्या गिरीश नलावडे यांची मुलगी सिद्धी हिने ‘सीए’ परीक्षेत यश मिळवले आहे. तिच्या या कौतुकास्पद यशाबद्दल भारतीय कामगार सेनेचे संजय कदम यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. शिवाय कर्मचाऱयाच्या वडिलांच्या औषधोपचारासाठी मदतही देण्यात आली.
सिक्वेल वनचे कामगार यश मराठे यांच्या वडिलांच्या एका मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी कामगार सेनेच्या वतीने मदत देण्यात आली. ही रक्कम कामगारांनीच जमा केली. ही मदत संजय कदम यांच्या हस्ते यश मराठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, सहचिटणीस मिलिंद तावडे, दिनेश परब, विजय शिर्वै व संजीव राऊत, सर्व युनिट पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य कामगार बंधूभगिनी मोठय़ा संख्येत उपस्थित होते.
भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यातून सिक्वेल वन प्रा. लि. कंपनीमधील कर्मचाऱयांना तीन वर्षांसाठी पगारवाढ करण्यात आली आहे. त्याबद्दल संजय कदम आणि सर्व पदाधिकाऱयांचा सत्कार कार्गो विभाग आणि कमिटीकडून करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List