सुनील शेट्टी यांच्या घरात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

सुनील शेट्टी यांच्या घरात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

अभिनेता सुनील शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आता सुनील शेट्टी पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. एवढंच नाहीतर, वयाच्या 60 व्या वर्षी देखील सुनील शेट्टी प्रडंच हँडसम दिसतात. एखाद्या तरुणाला लाजवेल असं सुनील शेट्टी यांचं फिटनेस आहे. सध्या सुनील शेट्टी ‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोचे जज म्हणून काम करत आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील शोची जज आहे.

दरम्यान, ‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोमध्ये सुनील शेट्टी यांनी लेक अथिया शेट्टी हिच्याबद्दल असं काही सांगितलं, ज्यामुळे लोकांनी त्यांचं अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यानंतर अथिया देखील चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करेल का? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

सांगायचं झालं तर, शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये होस्ट भारती सिंह, सुनील शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. भारती म्हणते, ‘सुनील सर तुमच्या मुलीला बाळ होणार तुम्ही आजोबा होणार…’ यावर सुनील शेट्टी यांनी जे वक्तव्य केलं ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील शेट्टी म्हणाले, ‘मी पुढच्या सीझनमध्ये जेव्हा येईल तेव्हा आजोबांप्रमाणे येणार…’ अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

अथिया शेट्टी हिचं लग्न

अथिया शेट्टी हिने 23 जानेवारी, 2023 मध्ये क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न सुनील शेट्टी यांच्या फार्महाउसमध्ये झालं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते.

अथिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सुनील शेट्टी यांची मुलगी असल्यामुळे चर्चेत असते. अथिया हिने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर देखील अथिया अनेक सिनेमांमध्ये झळकली. पण तिला झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही.

अथिया आता अभिनयापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;