भाजपाच्या जाहीरनामा समितीतून फडणवीसांना डावलले; राज्यातील दोन नेत्यांचा समावेश

भाजपाच्या जाहीरनामा समितीतून फडणवीसांना डावलले; राज्यातील दोन नेत्यांचा समावेश

लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे पक्षांचा जाहीरनामा. या जाहीरनाम्यावरून आणि त्यातील आश्वासने ध्येयधोरणे यावरून अनेकदा मतदान होते. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी जाहीरनामा महत्त्वाचा असतो. आता भाजपने जाहीरनामा समितीची घोषणा केली असून या समितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या समितीतून फडणवीस यांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या जाहीरनामा समितीत फडणवीस यांना स्थान देण्यात आले नसले तरी राज्यातील दोन नेत्यांचा या यादीत समावेश आहे. केंद्रीयमंत्री पियुष गोयल आणि भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना या समितीत स्थान मिळाले आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे, राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी 27 नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या जाहीरनाम्यापेक्षा फडणवीस यांना या समितीत स्थान का मिळाले नाही, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;