पुणे महापालिका मालामाल
पुणेकरांकडून मिळणारा मालमत्ता कर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी यासोबतच पेंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा वस्तू व सेवा कर अशा विविध प्रकारच्या कर व शुल्कापोटी 2023-24 या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 7 हजार 463 कोटी रुपये जमा झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास आणखी एक दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून महसूलवाढीवर भर देण्यात येतो. त्यानुसार या वर्षीही काही विभागांनी उद्दिष्ट पूर्ण केले, तर काही उद्दिष्टाजवळ पोहोचले आहेत. त्यामुळे संबंधित विभागांच्या महसूलात काही प्रमाणात वाढ होणार आहे. महापालिकेने 2023-24 वर्षाच्या अर्थसंकल्पात मिळकतकरापोटी 2 हजार 400 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळेल, असे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, 28 मार्चपर्यंत मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी अशा विविध करांपोटी 7 हजार 463 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List