Lok Sabha Election 2024 – रामटेकमध्ये 28 उमेदवारांत रंगणार लढत
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी 97 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. रामटेक मतदारसंघातून सर्वाधिक 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात 12 अपक्ष आहेत, तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून 10 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होईल.
निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण 181 उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील 110 उमेदवार पात्र ठरले, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
दुसऱया टप्प्यासाठी अर्ज
दुसऱया टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ जागांचा समावेश आहे. या टप्प्याकरिता अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 4 एप्रिल असून अर्जांची छाननी 5 एप्रिल रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल आहे, तर 26 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
रामटेक
काँग्रेस – श्यामकुमार बर्वे
बसप – संदीप मेश्राम
शिंदे गट – राजू पारवे
नागपूर
भाजप – नितीन गडकरी
काँग्रेस – विकास ठाकरे
बसप – योगेश लांजेवार
भंडारा-गोंदिया
भाजप – सुनील मेंढे
काँग्रेस – डॉ. प्रशांत पडोले
बसप – कुंभालकर संजय भैया
गडचिरोली
भाजप – अशोक नेते
काँग्रेस – करसन नामदेव
बसप – गोन्नारे योगेश नामदेवराव
चंद्रपूर
भाजप – सुधीर मुनगंटीवार
काँग्रेस – प्रतिभा धानोरकर
बसप – राजेंद्र रामटेके
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List