राज्यात 52 कोटींची दारू, रोकड, ड्रग्ज, सोने-चांदी जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

राज्यात 52 कोटींची दारू, रोकड, ड्रग्ज, सोने-चांदी जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

लोकसभा निवडणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणावर पैशाचा आणि मद्यवाटपाचा मोठा वापर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत राज्यात 52 कोटी 56 लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम व दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग अतिशय सक्रिय झाला असून ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत बेहिशेबी  रोकड, दारू, अमली पदार्थ, सोने व इतर मौल्यवान ऐवज जप्त केला असून याची किंमत 342 कोटी रुपये आहे.

राज्याच्या वेगवेगळय़ा भागात केलेल्या कारवाईत 33 कोटी 12 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. तर 23 लाख 42 हजार 360 लिटर दारू जप्त करण्यात आली. त्याची किंमत 19 कोटी 34 लाख रुपये आहे. राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांत रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ जप्त करण्यासाठी 1 हजार 656 भरारी पथके व 2 हजार 96 स्टॅटिट सर्व्हेलन्स टीम (एसएसटी) स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

n अमली पदार्थांच्या विक्रीवरही पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे. त्यामुळे या कारवाईत तब्बल 186 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत, तर 40 कोटी 23 लाख रुपयांचे सोने-चांदी असा मौल्यवान ऐवज जप्त केला आहे. तर मुद्देमाल 63 कोटी 17 लाख रुपयांचा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;